|| श्री ||
|| रेणुका विजयते ||
|| रेणुका माता ||
रेणुका धार्मिक विधी सेवा केंद्र
पं शामसुंदर शशिकांतराव पुराणिक वैदिक क्रमांत ज्योतिष विशारद ( गुरुजी ) रमल पंडित ( शास्त्री )
श्री गुरुजी या क्षेत्रात ( 1998 ) पासून आहेत. यांनी वैदिक शिक्षण पुज्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी, ब्रह्मसावित्री वेद विद्यापिठ पुष्कर राजस्थान येथे श्री महेश शास्त्री नंदे गुरुजी व पुजनीय गोडसे गुरुजी वाराणसी ( काशी ) या ठिकाणी गुरुकुल पारंपारिक पद्धतीने पुर्ण करून वास्तू ज्योतिष व रमलशास्त्र श्री चंद्रकांत शेवाळे दादा, श्री सिद्धेश्वर मारटकर व सौ जयश्री बेलसरे यांच्याकडे परिपूर्ण करुण 1998 साली गुरुजींनी मार्गदर्शनास, वैदिक कर्मकांड कार्यास सुरवात केली. श्री पुराणिक गुरुजी यांच्या वंशपुर्व परंपरागत पणजोबा, आजोबा, पिताजी नंतर हि परंपरा कायम ठेवून लोकसेवा धर्मसेवा उद्देशाने सर्वाना धार्मिक विधी उच्चस्तरीय पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने वाजवी दरात सेवा मिळावी या सहेतुने पंडितजी सेवाव्रत आहेत.
गुरुजी सर्व वैदिक धार्मिक विधी यात पारंगत आहेत जसे कि यज्ञ, याग, नवचंडी, शतचंडी, महारुद्र, लघुरुद्र, नक्षत्रशांती व सर्व शांती पूजा कर्म व इतर. सर्व धार्मिक परंपरेनूसार केले जातात यासाठी गुरुजी स्वतःसोबतच सर्व उत्कृष्ट पंडितांची इतर सेवा घेतली जाते. पुज्य गुरुजी हे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतातील मुख्य शहरात जसे कि दिल्ली, बेंगलोर, लखनऊ, चेन्नई, कोलकत्ता सहित परदेशात दुबई याठिकाणी आपली सेवा दिलेली आहे.
श्री गुरुजींनी जपानचे मा. पंतप्रधान युकिओ होतोयाम यांना देखील आपल्या पुजा कार्याने संतुष्ट केले आहे.
आमच्या सेवा
सर्वाना धार्मिक विधी उच्यस्तरीय पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने वाजवी दरात सेवा मिळावी या सहेतुने पंडितजी सेवाव्रत आहेत
पूजा विधी
गुरुजी सर्व प्रकारच्या पूजा विधी करतात जसे कि यज्ञ, याग, नवचंडी, शतचंडी, महारुद्र, लघुरुद्र, नक्षत्रशांती व सर्व शांती पूजा केल्या जातात.
ज्योतिष मार्गदर्शन
श्री गुरुजी हे दैनंदिन मनुष्याच्या आयुष्यातील समस्या संकटे यावर कुंडलीतील ज्योतिष्यशास्त्रद्वारे रमल शास्त्राद्वारे अचूक मार्गदर्शन करतात याचा आजवर हजारो लोकांनी लाभ घेतला आहे.
रत्नशास्त्र भांडार
ज्योतिष्यशास्त्राच्या आधारावर सर्व संकटांच्या परिहारार्थ रत्न शास्त्रावर आधारित रत्न सुचवून ते उत्तम किमतीत उपलब्ध केले जातील.
वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्राच्या सर्व शाखाद्वारे आपल्या घरी येऊन आधुनिक मॅग्नेटिक स्कॅनर सहित आधिनिक यंत्राद्वारे वास्तू परीक्षण करून विनातोडफोड उपाय सुचविले जातील.
पूजा विधी
वास्तुशांती
या विधीमध्ये आपण घर किंवा फ्लॅट बांधत असतात. भूमिपूजन पासून तयार होईपर्यंत त्यामध्ये काही अशुभ गोष्टी घडल्या असतील तर त्याच्या परिहारा सोबत या पुजेमध्ये प्रारंभी गणेश पूजन, द्वारपूजन व गृहप्रवेश करतात यानंतर वास्तूमध्ये आठ प्रकारचे धातू उत्पन्न दोष निवारण करुन संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन विश्वउर्जा निर्माण होण्यामागे वास्तुपुरुषा समवेत ८१ प्रकारच्या देवता आपल्या घरात स्थित असतात. त्या सर्वांसमवेत गणेश षोडषमातृका नवग्रह रुद्र इ. पुजा करून होम हवन केले जाते. उपरांत घरातील अग्नेय कोपऱ्यात वास्तू निक्षेप करून हा विधी संपन्न होतो. यामुळे घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्त होते.
सत्यनारायण महापुजा
यात भगवान महाविष्णूस्वरूपी सत्यनारायण देवतेची पुजा करून कृपा प्राप्तीसाठी इच्छा मनोकामना पूर्तीसाठी स्कंद पुराणातील भगवंतांच्या कयेचे वाचन होते. ही पुजा अत्यंत प्रचलित आहे.
नक्षत्र जनन शांती
या पुजेत जन्मसमयी अशुभ नक्षत्र असेल तर जसे कि मुळ, जेष्ठा, आश्लेषा, कृतिका, मधा व इतर नक्षत्राद्वारे आलेली नकारात्मकता दूर करून नवग्रह कृपा प्राप्तीहेतू इच्छित मनोकामना पूर्तीसाठी केली जाते.
नवग्रह शांती पुजा
यात जन्मसमयी कुंडलीत असलेल्या अशुभ नवग्रह युती, महादशा इतर दोष परिवार निवारण होऊन सुखशांती कार्यसिद्धी प्राप्तीकरिता केली जाते.
महामृत्युंजय याग
गंडातर योग, अपमृत्यू निवारण, सही सकल बाधा निवारण होऊन दीर्घायुष्य प्राप्तीसाठी भगवान महादेव मृत्युंजय देवतेच्या कृपा प्राप्तिकरता याचे अनुष्ठान करतात.
नवचंडी शतचंडी याग
भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती जगदंबा कुलदेवी कृपा प्राप्तिकरता बाह्यप्रकार दोष, संकट निवारण राजकारणात यशस्वीता प्राप्ती, संतान प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती सहीत सर्व प्रकारच्या कार्यसिद्धी करीता करतात.
गणेश याग
श्री महागणेशाच्या कृपा प्राप्ती सहीत सर्व विघ्न निवारण हेतू मंगलकार्य प्राप्तीसाठी , धन धान्य समृद्धीसाठी हा विधी करतात.
लघुरुद्र महारुद्र
भगवान शंकराची विशिष्ट कृपा प्राप्ती व्हावी व त्यासाठी सकल मनोकामना पूर्तीसाठी विशिष्ट रुद्र आवर्तन अभिषेक करून त्याद्वारे संपन्न केला जातो.
प्रशस्ति पत्र
फोटो
संपर्क
- रेणुका ज्योतिष्यालय, धार्मिक विधी सेवा केंद्र, शॉप नं. २, कल्पवृक्ष सोसायटी, जवळकर नगर, पिंपळे गुरव, पुणे, महाराष्ट्र - 411061.
- +91 9850411234 / +91 8421790009
- sai1008rmp@gmail.com